Pratibimb
HomeAbout usArticlesStoriesConditionsForumParivarChatDoubtsBlogLinksDiscussionsFeedbackGovt SchemeContact Us
Member Login  Username:   Password:   Register Now

  News
 
Appa Redij... No more !
Oct 27, 2010

Raghunath Redij, aka Appa is no more. An hard-core activist who started Sugava Mishra Vivah Mandal some...Read more

Hindustan Times 20-12-2009 Mumbai Cafe
Dec 29, 2009

The search for a life partner just got more interesting. That is if one is willing to forgo conventional parameters of caste, creed,...Read more

Win for Dhanak
Oct 03, 2009

Government directive that directs all the Marraige Officers of Delhi to not to send any notice of intimation to the parents...Read more

Read All News

  Site Blog
 
DateTitle
May 24, 2009गुरुकिल्ली
Oct 26, 2008PRATIBIMB WEBSITE
Jan 03, 2015 life is beautiful
Oct 20, 2008 Live-in Relationship..

  Success Stories
 
साथीदार

by ManjuJoshi

                    परंपरा तोड़ता येत नाही म्हणुन किंवा आई-वडील , ज्येष्ठांनी , समाजाने पाळायला हवी म्हणून अलिखित सक्ती केली म्हणून ती पाळणे माझ्या...
Read more
Read All Stories

  Shoutbox
News from Intercaste Blogs
<div style="background-color: #5b78eb;"><a href="http://www.rsspump.com/?web_widget/rss_widget/twitter_widget" title="web widget">Twitter Widget</a></div>


Unmesh Bagwe
गद्धे-पंचविशी
आमच्या लग्नाची गोष्ट म्हणजे केवळ माझ्या लग्नापुरती मर्यादित नाही, माझ्या विशी-पंचविशी-तिशी ची कहाणी आहे. माझं लग्न हा आमच्या मित्रांच्या काळजीचा विषय होता, कारण माझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्याशी लग्न करणारी कोणी मिळणार नाही आणि उन्मेष आयुष्यभर ब्रम्हचारी राहणार अशी त्यांना खात्री होती........
मी स्वतः डाव्या समाजवादी चळवळीत बराच क्रियाशील होतो, तो एक झपाटलेला काळ होता, क्रांती होईल असे काही वेडं स्वप्न आम्ही (किंवा मी) पहात नसू, पण समाज-परिवर्तन व्हायला हवे, सामाजिक , आर्थिक समता हे जरूर आमचे स्वप्न होते, ध्येय होते, त्यासाठी मेहनत करायची तयारी होती, पुर्ण-वेळ कार्यकर्ता होण्याची मानसिकता होती. चळवळीतून अनेक चांगले मित्र जोडले गेले आणि खूप चांगली वैचारिक जडण-घडण होत गेली. समता आंदोलन, सोशालिस्ट फ्रंट ते समाजवादी जन परिषद असा तो प्रवास ....हे सगळं सांगण्यामागचा उद्देश की सरळ साधं सोप्पं आयुष्य, नोकरी आणि संसार अशी मळलेली वाट न चालता काही तरी ध्येयवादी, परीवर्तनवादी वाट चोखाळावी आणि सामाजिक परिवर्तनाला हातभार लावावा, अशी मानसिकता तयार झाली, ती चळवळीमुळे. फुले, आंबेडकर आणि साने गुरूजी च्या महाराष्ट्रातील जाती-जातीतील भेदा-भेद, तेढ कमी व्हावा, अशी इच्छा होती व मराठा जातीच्या बाहेरच लग्न करून चळवळीतून मिळालेला वारसा सिद्ध करावा, हे नक्की होतं.
अशात माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली, ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मस्जिद पाडली गेली. त्यानंतर देशभरात हिंदू-मुस्लीम दंगे उसळले, मुंबई पेटली. दोन समाजातील वैर पराकोटीला जाताना दिसत असताना माझ्यातला कार्यकर्ता खूप अस्वस्थ होत होता. आपल्या डोळ्यासमोर सामाजिक वैमनस्य, तेढ वाढतेय आणि मी काही करू शकत नव्हतो ही जाणीव, हतबलता मला दिवसेंदिवस असह्य होत होती, सुदैवाने मुंबई शांत झाली, पण मी अस्वस्थच होतो, आणि माझ्या डोक्यात एक किडा वळवळायला लागला. जर आपण स्वतःला एक परिवर्तनवादी कार्यकर्ता समजत असू तर जातीबाहेर काय, धर्माबाहेर आणि तेही मुस्लीम धर्मातील मुलीशी लग्न करायचे साहस मी करू शकेन काय ? सामाजिक परिवर्तनाच्या गप्पा खूप मारल्या आता कृती करायची वेळ आली आहे, असं माझ्यातला कार्यकर्ता मला सांगू लागला, असं लग्न करण्याने सामाजिक परिवर्तन होईल असं नव्हे, किंवा अशा लग्नामुळे हिंदू - मुस्लीम समाजातील वैर कमी होईल, असं मानण्याएवढा दूधखूळा मी नक्कीच नव्हतो. किंवा माझ्या लग्नामुळे क्रांती होईल, असं मला नक्कीच वाटत नव्हतं फक्त अशी कृती करून जाती-जाती, धर्मा-धर्मा तील रोटी-बेटी व्यवहार वाढावेत, ह्या विचाराला हातभार लागू शकेल, याचा विश्वास होता. अशी लग्नं होऊन जाती-जाती, धर्मा-धर्मा ची बंधने गळून पडली तर तेवढाच सामाजिक चळवळीला हातभार, हे समाधान खूप मोठे.....
मित्रांनी मन वळवायचा प्रयत्न खूप केला, पण ठाम राह्यलो. फक्त काळजी होती, आईची, तिला मोठा धक्का बसेल, याचं मनोमन वाईट वाटत होतं. पण १० वर्ष चळवळीत क्रियाशील होतो आणि ज्या विचारांची बांधिलकी मानली होती, ते विचार खरे आहेत, समाज-बांधणीचे आहेत, याची कसोटी होती म्हणून ठरवलं की करायचं तर मुस्लीम मुलीशी लग्न करायचं नाही तर नाही. शोध सुरू झाला, पण प्राधान्य नव्हतं, कारण असं स्थळ मिळणार कुठे ? जाहीरात देखील दिली, उत्तरं आली, पण मुस्लीम मुलीकडून नाही. रवी कदम, मोहन सकपाळ, प्रकाश डाकवे आदी मित्रांनी मागे पडून सुगावा मिश्र विवाह मंडळात नांव नोंदवायला भाग पाडले, आणि अप्पा रेडिज आणि सुधा कावतकर यांच्या सहाय्याने यास्मीन काझी हिची भेट (४ डिंसेबर) झाली. यास्मीन माझ्यापेक्षा वयाने मोठी, शिक्षण जास्त, तिला माझ्या होकाराची खात्री नव्हती. 
आत थोडं लग्नाविषयी च्या माझ्या दृष्टीकोनाबद्दल..
मुस्लीम मुलीशी लग्न करायचं ठरविलं पण म्हणून लग्न डोळे उघडे ठेऊनच लग्न करणार होतो, डोळे मिटून नाही. केवळ रूप, शिक्षण (किंवा याबाबतीत धर्म) या गोष्टींना महत्त्व न देता एकमेकांचा स्वभाव, आवडी-निवडी, भावी आयुष्याबाबतीतील योजना/ विचार हे घटक मला महत्त्वाचे वाटत होते, याची माहिती एका भेटीत होत नसते, म्हणून माझी अट होती, पाच भेटीनंतरच हो किंवा नाही सांगायचं, प्रथम-दर्शनी वगैरे मला मान्य नव्हतं. यास्मीनला ही ते मान्य होते. आयुष्यातील जोडीदार निवडताना या गोष्टींना महत्त्व असते, आणि एकदा जोडीदार निवडला, तर परस्पर-विश्वास आणि सामंजस्य यावर भर देणे महत्त्वाचे. 
होकार पाच भेटींनंतर मिळाला, नंतर जवळपास एक वर्ष गेलं पार्श्वभूमी तयार करण्यात ! येथे आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे, यास्मीनच्या दृष्टीने देखील रंग-रूप, पैसा-अडका, गाडी-घर या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या, तिची अट होती, एक चांगला मित्र जिवन-साथी म्हणून मिळावा. तिने निर्णय घेताना फक्त माझा स्वभाव , माझी भूमिका पाहीली, मला नोकरी खरंच आहे का, पगार किती आहे, स्वतःचं  घर आहे का, हे काहीही तपासलं नव्हते, आपलं लग्न एका चांगल्या व्यक्तीशी होतंय, हे तिच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. यास्मीनची आई सारस्वत ब्राम्हण, व चाळीस वर्षापूर्वी मुस्लीम गृह्स्थाशी लग्न करण्याचे धाडस केलेली शिवाय मोठ्या बहिणीचे मराठी कुटुंबात लग्न झालेले, लहाणपणापासून मराठी संस्कार, त्यामुळे त्यांच्या घरातून विरोध अजिबात नव्हता. आमच्या घरी मात्र युद्धाचे वातावरण होतं, पण माझा आग्रह ठाम होता, त्यामुळे अनेक प्रयत्नांनंतर, छॊट्या बहिण-भावाच्या पाठींब्यामुळे थोडा विरोध मावळला, पण आइचा विरोध कायमच होता, शेवटी ’ लोक काय म्हणतील, समाजात नाचक्की होईल’ या फालतू विचारामुळे गाडी अडत होती. शेवटी आईसाठी म्हणून एक अक्षम्य अशी तडजोड करायला मी तयार झालो. लग्नाच्या वेळी लोकांना खोटं सांगायचे की यास्मीन ही यास्मीन काझी नसून जुई कावतकर आहे. ही खूप प्रचंड खोटी तडजोड करूनही साध्य काहीच झालं नाही.
लग्नापूर्वी आमच्या दोघांचा निर्णय आम्ही अंमलात आणताना पुण्यातून साडे-तिन महिन्याची अपूर्वाई आणि मुबईतून साडे-तिन वर्षाचा कबीर आमच्या कुंटुंबात आले, आज आमचं कुटुंब छानपैकी चौकोनी, आणि ब-यापैकी कौतुकाचा विषय आहे...Site managed by Unmesh Bagwe