Pratibimb
HomeAbout usArticlesStoriesConditionsForumParivarChatDoubtsBlogLinksDiscussionsFeedbackGovt SchemeContact Us
Member Login  Username:   Password:   Register Now

  News
 
Appa Redij... No more !
Oct 27, 2010

Raghunath Redij, aka Appa is no more. An hard-core activist who started Sugava Mishra Vivah Mandal some...Read more

Hindustan Times 20-12-2009 Mumbai Cafe
Dec 29, 2009

The search for a life partner just got more interesting. That is if one is willing to forgo conventional parameters of caste, creed,...Read more

Win for Dhanak
Oct 03, 2009

Government directive that directs all the Marraige Officers of Delhi to not to send any notice of intimation to the parents...Read more

Read All News

  Site Blog
 
DateTitle
May 24, 2009गुरुकिल्ली
Oct 26, 2008PRATIBIMB WEBSITE
Jan 03, 2015 life is beautiful
Oct 20, 2008 Live-in Relationship..

  Success Stories
 
साथीदार

by 

                    परंपरा तोड़ता येत नाही म्हणुन किंवा आई-वडील , ज्येष्ठांनी , समाजाने पाळायला हवी म्हणून अलिखित सक्ती केली म्हणून ती पाळणे माझ्या...
Read more
Read All Stories

  Shoutbox
News from Intercaste Blogs
<div style="background-color: #5b78eb;"><a href="http://www.rsspump.com/?web_widget/rss_widget/twitter_widget" title="web widget">Twitter Widget</a></div>


admin1's Blog
गुरुकिल्ली
May 24, 2009
 
      एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही
      ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले
      की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला,
      "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने
      उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे
      उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे
      दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.

       प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या
      प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता,
      त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक
      पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे
      काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला  प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं             त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना  कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन           आहे ते  जरा दृश्य  स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले      तुमचे  तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

      प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही
      महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच
      नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू
      लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या
      तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात.
      नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही
      जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी
      किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा  फरक असल्याचे तुम्हास जाणवते.         या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या  साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड       चुकली तर नाही ना?
      तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का
      होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते
      . आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

      नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे
      . नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती
      तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding
      in a relationship is not finding the right person; it's learning to
      love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी
      आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात.
      विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक
      सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

      स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार
      टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर
      उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत
      नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता
      छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये
      असाल.

      कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली -
      जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच
      प्रेम करायला शिकणे - ही आहे.
Views: 9    Rating: 0  (based on 0 votes)Site managed by Unmesh Bagwe